श्रीमती शोभा गणपतराव तोटावाड – नांदेड जिल्हा

परिचय

 • जन्म दिनांक -30/06/1982
 • प्रथम नेमणूक दिनांक 17/07/2009
 • शिक्षण -एम्.ए, डी.एड्,बी.एड्
 • नोकरीचा कालावधी- 09 वर्षे
 • शाळा-जि.प.प्रा.शा.हिप्परगा थडी 

  शैक्षणिक कार्यातील योगदान –

 • ब्रिटीश काँन्सिल च्या Tejas उपक्रमात  एका वर्षापासुन TAG coordinator म्हणुन कार्यरत.
 • 2017-18 मध्ये  Spoken English program मध्ये Block level English Ambassador म्हणुन कार्य
 • 2015-16 मध्ये महिलांसाठी तंत्रस्नेही प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून निवड.
 • स्मार्ट गर्ल प्रशिक्षणात विविध उपक्रमाचे आयोजन.
 • जिल्हा स्तरीय तंत्रस्नेही मास्टर ट्रेनर म्हणून अनेक कार्यशाळेचे आयोजन.
 • वाचन लेखन प्रसशिक्षणात सुलभकाची भूमिका.
 • बालरक्षक म्हणून शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन.
 • CCRT दिल्ली येथे integration Art and Craft प्रशिक्षणासाठी निवड.
 • कृतिशील शिक्षक महाराष्ट गटाची जिल्हा संयोजिका.
 • शिक्षकांना आपले कार्य ,राबविले गेलेले उपक्रम इतरांपर्यंत पोहचवता यावेत व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी ATM निर्मित *ज्ञानगुरु*या ई-शैक्षणिक अंकाची संपादिका.
 • विविध तालुकास्तरीय कार्यशाळा, केंद्रसम्मेलने,शिक्षण परिषद यात सुलभक, साधनव्यक्तीची भूमिका.
 • समाजसहभागातुन हिप्परगा येथे डिजिटल स्कूल स्थापना
 • विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून *लोखंडे ट्रस्ट*कडून विविध पुस्तके मिळवण्यात यश.
 • गावातील नवयुवकांच्या मदतीने *डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रतिष्ठाण* ची स्थापना व सहकार्याने विविध उपक्रमाचे आयोजन.

  पुरस्कार

 • 2009 मध्ये मुलींची उत्कृष्ट पटनोंदनी पुरस्कार.
 • 2016 -2017 चा गुणी शिक्षक पुरस्कार
 • 2018-2019 चा तालुकास्तरीय पुरस्कार.

  शाळेतील उपक्रम

 • स्काऊटगाईडचे  खरी कमाई,श्रमदान विविध उपक्रम
 • सावित्रीबाई फुले जयंतीनिम्मित लेक वाचवा ,लेक शिकवा अभियानात विविध उपक्रमाचे आयोजन.
 • *अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना जनजागृती विशेष कार्यक्रम*.
 • महिला दिन, हळदीकुंकू आशा विविध कार्यक्रमातून महिलांचे प्रबोधन.
 • मुलींच्या शिक्षणसंबंधी जनजागरण व्हावे म्हणून पथनाट्ये ,विविध नाटिका चे आयोजन.
 • सहशालेय उपक्रमांचे आयोजन
 • SpokeEnglish च्या सर्व activities चे आयोजन.
 • टाकाऊपासुन टिकाऊ वस्तू करणे,कचरा व्यवस्थापन याचे मार्गदर्शन
 • अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर.
 • विद्यार्थ्यांना थोर व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून *ओळख थोरा-मोठ्यांची* या नवोपक्रमाचे आयोजन व जिल्हास्तरावर निवड.