संजय भीमराव खाडे – औरंगाबाद जिल्हा

परिचय

 • शिक्षण एम .ए .डी.एड, बी.एड
 • जन्म दिनांक-०२.०७.१९७५
 • पद- पदवीधर प्राथमिक शिक्षक
 • शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजापुर, केंद्र एकतूनी, तालुका -पैठण जिल्हा -औरंगाबाद.
 • एकूण सेवा – 23 वर्षे

  पुरस्कार –

 • जिल्हा परिषद औरंगाबादचा 2016 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार
 • 2018 चा महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार
 • महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती चा 2016 चा आदर्श शिक्षक पुरस्कार
 • औरंगाबाद जिल्हा गुणवत्ता कक्ष शिक्षक प्रतिनिधी म्हणून सदस्य.
 • CCRT नवी दिल्ली येथे “Role of School in conservation of the Natural & Cultural Heritage” या प्रशिक्षनासाठी निवड झाली होती.
 • NCERT नवी दिल्लीच्या कला विभागात Master Trainer प्रशिक्षनासाठी निवड झाली होती.
 • स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या श्रमदानातून
 • गेवराई मर्दा या जन्मगावी 100% शोषखड्डे, निर्मल नीर,विहीर पुनर्भरण,1000 वृक्षारोपण इत्यादी प्रयोग राबविले.
 • कविता ,कथा , शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे शैक्षणिक मासिके यामधून प्रकाशित.
 • ऍक्टिव्ह टीचर्स  महाराष्ट्र  या कृतिशील शिक्षकांच्या  समूहाचे  औरंगाबाद जिल्हा संयोजक. ●शिक्षकांनी आपले उपक्रम  सर्वांसाठी  लिहावे  व सर्वांना उपयुक्त व्हावे म्हणून  प्रकाशित ‘ज्ञानगंगा’ या वार्षिक अंकाचे  संपादक .
 • मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे  कविता सादरीकरण
 • जाणिवा ग्रुप आयोजित काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक
 • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) मराठी विषय विषय सदस्य
 • शाळा आयएसओ मानांकन करण्यात शाळेचा प्रतिनिधी म्हणून काम.
 • शाळेसाठी लाखो रुपयांचा लोकसहभाग उभा करण्यात मोलाची कामगिरी.
 • ई लर्निंग स्कूल, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल
 • शाळेतील उपक्रम-  बालसृष्टी या भीतीपत्रकातून विद्यार्थ्यांना कविता, कथा, चित्र लेखनासाठी प्रोत्साहन.
 • विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, निमित्ताने शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करून मुलांना अभिव्यक्तीची संधी
 • डॉ.अब्दुल कलाम वाचनालय शाळेत उभारून 700 पुस्तके उपलब्ध केली आहे.विद्यार्थी अवांतर वाचन करतात.
 • विज्ञान प्रयोगशाळा, प्रश्नमंजुषा , विद्यार्थी बँक ,विचारा तुम्ही सांगतो आम्ही , एक मूल एक झाड, क्षेत्रभेटी ,सहली, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.
 • आतापर्यंत 25 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व चार विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे निवड
 • अनेक विद्यार्थी कविता लिहितात, कथा लिहितात. विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
 • माय आणि माती हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.