रोहिणी राजेश चव्हाण – अमरावती जिल्हा

नाव : रोहिणी राजेश चव्हाण
गाव : अचलपूर जिल्हा : अमरावती
शिक्षण : बी.ए .( भूगोल , समाजशास्त्र)  एम.ए.(शिक्षणशास्त्र) बीएड
शाळा : जि.प.प्रा .शाळा बोराटाखेडा
पं.स. : चिखलदरा जि. अमरावती
एकुण सेवा : 18 वर्षे 6 महिने
जन्म तारीख : 15 / 03 / 1980
प्रथम नियुक्ती : 21 /  07 / 2000
पद : सहाय्यक शिक्षिका
पुरस्कार :
1) सत्र 2018 – 19 जिल्हा विशेष आदर्श पुरस्कार अमरावती जि.प .
2) सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी
3) राज्यस्तरीय क्रुतीसंशोधन
विशेष काम :
1) रक्त दान शिबिरात सहभागी
2) इयत्ता १ , २ , ३ ,४ थीच्या पाठयपुस्तकातील घटकांवर शैक्षणिक   व्हिडिओ निर्मिती
3) महाराष्ट्र शासनाच्या दीक्षा एपवर इयत्ता पहिली पाठयपुस्तकातील क्युआर कोडवर शैक्षणिक व्हिडीओ
4) बालभारती पूणे येथे  महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळ अभ्यास गट सदस्य मराठी विषय
5) शाळासिध्दी राज्य निर्धारक म्हणून यवतमाळ येथे शाळा तपासणीसाठी.
6) शाळेत विविध उपक्रमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव
7) लिंगसमभाव विषयक प्रशिक्षण NCERT भोपाळ येथे
8) तालुका स्तरावर विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून
9) जीवनशिक्षण मासिकात लेख प्रसिद्ध तसेच सहस्त्रार्जुन वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध
10) बालरक्षक या नात्याने पंधरा शाळाबाह्य विद्यार्थींना शाळेत दाखल केले .
11) शिक्षणाची वारी नांदगाव पेठ जि.अमरावती येथे ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य स्टाँल.
12) शाळा डिजिटल करण्यासाठी गावातून लोकवर्गणी जमा केली.
13) स्वतःच्या वर्गाला चाईल्ड थेटर बनविण्यासाठी स्वखर्चाने बारा हजार रुपये लावून रंगरंगोटी.
14) दरवर्षी विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनचे वाटप . यावर्षी आदिवासी क्षेत्रात काम करताना तेथील विद्यार्थ्यांना दप्तर , पाटीचे पण वाटप.
15) दरवर्षी माणुसकीची भिंत उपक्रमाखाली गरजू आणि वंचितांना कपडे वाटप.
15) राष्ट्रीय मोहीमेत सहभागी . झाडे लावा झाडे जगवा , जणगणना , कुटुंब कल्याण केसेस , दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळावी यासाठी प्रयत्नशील
16) सहली , क्रिडा , प्रश्न मंजुषा , क्षेत्रभेटी , शब्दांच्या भेंडया ,सांस्कृतिक कार्यक्रम ,नेत्यांच्या जंयत्या पुण्यतीथी निमित्ताने सभाधीटपणा , चावडीवाचन , पारंपरिक खेळातुन अध्ययन अनुभव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.
17 ) एटीएम अमरावती,परभणी  समुहाची जिल्हा संयोजक.
18) शाळासिध्दी कार्यक्रमात शाळा अ श्रेणीमध्ये आणण्यासाठी मोलाची कामगिरी.
19) श्री.सचिन शेळके यांच्या इयत्ता पहिली ,दुसरीच्या एपवर शैक्षणिक व्हिडीओ , श्री. मधुकर माळी यांच्या शाळा एपवर शैक्षणिक व्हिडीओ तसेच श्री . बालाजी जाधव यांच्या फ्लिपबुकवर माझ्या शैक्षणिक व्हिडीओंचा समावेश.
संशोधन :
1) डी.एस.एम.यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक
2) राज्यस्तरीय क्रुतीसंशोधन एस.सी.ई.आर.टी.पूणे
3) एम.ए.शिक्षणशास्त्र शोधप्रबंध