श्री नितीन भास्कर शेजवळ – पुणे जिल्हा

परिचय
 • शिक्षण एम ए अर्थशास्त्र डिएड.
 • जन्मदिनांक 15/06/1981
 • प्राथमिक शिक्षक शाळा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे ,तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे .केंद्र चांडोली बुद्रुक बीट मंचर
 • एकूण सेवा सोळा वर्ष
 • शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा तज्ञ मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे
 • पाचवी नवीन वर्ग शाळेला जोडण्यासाठी शैक्षणिक लढा उभारून इयत्ता पाचवी नवीन वर्ग सुरू करून शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेत 35 विद्यार्थी झळकले आहेत
 • पहिल्याच पाचवीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील सर्व प्रथम येणारा विद्यार्थी हा बहुमान देखील प्राप्त केला आहे
 • तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अनेक शिष्यवृत्ती कार्यशाळा घेऊन त्याद्वारे अनेक शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे
 • तालुक्यातील सर्वाधिक  विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक करण्याचा उच्चांक नोंदवला आहे .
 • विविध जिल्ह्यांमध्ये शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन देत आहेत
 • आज अखेर शिष्यवृत्ती परीक्षेत 178 विद्यार्थी व नवोदय परीक्षेत नऊ विद्यार्थी झळकले आहेत
 • इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाचा247  वरुन 423  पट केला असून तालुक्यातील सर्वाधिक पटाची शाळा बनवली आहे.
 • शाळेसाठी परिसरातून व विविध गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत दाखल झाले आहेत शाळेच्या 3 स्कूलबस विद्यार्थी वाहतुकीसाठी उपलब्ध असून त्याद्वारे आजूबाजूच्या गावांतील व परिसरातील दोनशे विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी येत आहेत .
 • एटीएम पुणे या या समूहाच्या ज्ञानपीठ या ई अंकाचे संपादक म्हणून अंक प्रसिद्ध करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
 • वर्षभर सुट्टी न घेता शनिवार-रविवार पूर्णवेळ विद्यार्थी मार्गदर्शन करण्यासाठी वेळ दिला जातो.
 • 100% प्रगत वर्ग व अ + दर्जा टिकवून ठेवला आहे.
 • आज अखेर मिळालेले पुरस्कार .
 • सन 2010 -2011 ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे आदर्श शिक्षक सन्मान .
 • सन 2011 -2012 जिल्हा परिषद पुणे शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक पुरस्कार
 • सन 2016 17 आदर्श शिक्षक पुरस्कार भारतीय जनता पार्टी आंबेगाव
 • सन 2017 18 पंचायत समिती आंबेगाव शिष्यवृत्ती शिक्षक पुरस्कार
 • सन 2017 18 जिल्हा परिषद पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक शिष्यवृत्ती पुरस्कार
 • सन 2017-2018 जाणता राजा प्रतिष्ठान सामाजिक कार्याबद्दल समाज गौरव पुरस्कार
 • सन 2017- 18 पंचायत समिती आंबेगाव आदर्श शिक्षक पुरस्कार
 • 2018 19 पुणे जिल्हा परिषद पुणे विशेष शिक्षक पुरस्कार
 • आजवर अशा अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले आहे .