नारायण चंद्रकांत मंगलारम

नाव- नारायण चंद्रकांत मंगलारम
●शिक्षण- एम .ए ( मराठी ,इतिहास ) डी.एड, बी.एड ( हिंदी ,सामाजिक शास्त्र )
● जन्म दिनांक-२१.१०.१९८०
●पद- प्राथमिक शिक्षक
●शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी , केंद्र उंबरे, तालुका -राहुरी जिल्हा -अहमदनगर.
●एकूण सेवा – १५ वर्षे
●पुरस्कार –
◆ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 2016 चा जिल्हा गुरूगौरव पुरस्कार
● कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक .
● ATM महाराष्ट्रच्या तीन राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग .
● निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव.
● महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ( बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.
● AINET च्या २०१६ च्या नागपूर येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सहभाग
● AINET च्या २०१८ च्या मुंबई इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन
●CCRT नवी दिल्ली येथे “Role of School in conservation of the Natural & Cultural Heritage” या प्रशिक्षनासाठी निवड .
●CCRT गुवाहाटी येथील प्राथमिक शिक्षकांसाठीच्या ओरिन्टेशन कोर्स साठी निवड.
●NCERT नवी दिल्लीच्या कला विभागात Master Trainer प्रशिक्षनासाठी निवड.
● लेख ,कथा , शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे, शैक्षणिक मासिके यामधून प्रकाशित.
● ATM अहमदनगरच्या ‘ज्ञानसूर्य’ या ई शैक्षणिक अंकामध्ये लेखन आणि संपादक म्हणून काम केले.
● ATM च्या विविध जिल्हा शाखांच्या ई शैक्षणिक अंकांच्या निर्मिती प्रक्रियेत मदत.
● राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन उमरगा येथे कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान आणि कथा सादरीकरण.
● मराठी समाज उत्तर प्रदेश आयोजित शिवजन्म भूमी शिवनेरी ते लखनऊ विद्यापीठ ,लखनऊ ह्या १६५१ किमी मोटार सायकल यात्रेत सक्रिय सहभाग.
● रेडीओ सिटी वर शिवजयंतीच्या दिवशी विशेष मुलाखत प्रसारित .
● अहमदनगर आकाशवाणी केंद्रावरून ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित.
● नाशिक जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेत ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन .
● बालरक्षक म्हणून कार्यशाळेत मार्गदर्शन आणि विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न .
● शाळेसाठी लाखो रुपयांचा लोकसहभाग उभा करण्यात मोलाची कामगिरी.
● ई लर्निंग स्कूल, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल
● शाळेतील उपक्रम-  बालसृष्टी या भीतीपत्रकातून विद्यार्थ्यांना कविता, कथा, चित्र लेखनासाठी प्रोत्साहन.
● विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, निमित्ताने शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करून मुलांना अभिव्यक्तीची संधी.
● डॉ.अब्दुल कलाम तरंग वाचनालय शाळेत उभारून 300 पुस्तके उपलब्ध केली आहे.विद्यार्थी अवांतर वाचन करतात.
● कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन .
● शाळास्तरीय बालआंनद मेळाव्याचे दरवर्षी नियमित आयोजन.
● विज्ञान दिन, संविधान दिन , प्रश्नमंजुषा , विद्यार्थी बँक ,विचारा तुम्ही सांगतो आम्ही , दुर्गुणांची होळी ,एक मूल एक झाड, क्षेत्रभेटी ,शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.
● शाळेतील विविध उपक्रमाचे चित्रीकरण करून youtube वर अपलोड केले आहेत