जगदीश श्रीकृष्ण कुडे – जालना जिल्हा

शिक्षकाचे नाव:-जगदीश श्रीकृष्ण कुडे.

शाळेचे नाव  :-जि.प.प्रा.शाळा श्रीराम तांडा ता.मंठा जिल्हा जालना.

जन्म दिनांक:- ०२/०१/१९७७

gmail id   :-jagadishkude199@gmail.com

शाळेची पूर्वीची पट संख्या:- २५

शाळेची आजची पट संख्या:-१४७

{यापैकी गावातील फक्त ३० मुले असून बाहेर गावाहून १५ खेड्यातील ११७ मुले         खाजगी स्कूलबस ने शिक्षणासाठ श्रीराम तांडा शाळेत येतात.}

इंग्रजी माध्यमाच्या मुलांचे ४० प्रवेश,शालेय परिसरात १५० मोठी झाडे आहेत.या झाडाखाली बसून आंनददायी वातावरणात स्वयं गट अध्ययन पद्धतीने शिक्षणाचे धडे घेतात.विद्यार्थीगुणवत्ता वाढीसाठी शालेय व सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. शाळेबरोबरच गावात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबून आदर्श गाव तयार केले आहे.शाळेबरोबरच गाव सुद्धा प्रगत झालेले आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रेरक अधिकारी म्हणून निवड

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रेरक अधिकारी म्हणून पुणे,सोलापूर,उस्मानाबाद,या जिल्ह्यासाठी निवड झाली होती.सदरील जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्य शाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.शाळा प्रगत करण्यासाठी प्रेरणादायी स्व-अनुभव सदरील कार्यशाळेस कथन केले.

महाराष्ट्र राज्याचे पहिले बालरक्षक म्हणून निवड

९ जानेवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रधान शिक्षण सचिव मा.नंदकुमार साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले बालरक्षक म्हणून श्री.जगदीश कुडे यांच्या नावाची घोषणा केली.बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून मा.नंदकुमार साहेब प्रधान शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने व विद्याप्राधीकरण,समता विभाग पुणे,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळाबाह्य व स्थलांतरीत मुले शाळेच्या प्रवाहात यावी व प्रत्येक मुल शाळेत टिकले पाहिजे व शिकले पाहिजे या साठी राज्यस्तरीय कार्यशाळा,विभागीय कार्यशाळा,जिल्हास्तरीय कार्यशाळा,तालुकास्तरीय कार्यशाळेला उपस्थित राहून स्व-अनुभवाचे बोल कथन केले.व विद्यार्थी स्थलांतर कशा पद्धतीने रोखु शकतो,याबद्दल मार्गदर्शन केले.बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून राज्यातील शाळाबाह्य व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठीराज्यभर नेत्रदीपक यश मिळाले आहे.बालरक्षक चळवळीची दिल्ली सरकारने देखील दखल घेतली असून,दिल्ली बालहक्क आयोगाने जगदीश कुडे यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.तसेच श्रीराम तांडा शाळेवर आधारित समता विभाग पुणे यांनी बालरक्षक चळवळ या विषयावर लघुपट तयार केला आहे.

तज्ञ मागर्दर्शक म्हणून निवड:-

महाराष्ट्र राज्यातील वर्ग १ व वर्ग 2 नवनियुक्त अधिकारी यांच्या पायाभूत प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड. या अंतर्गत यशदा पुणे,अमरावती याठिकाणी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे.तसेच अधिकारी वर्गाचा प्रतिसाद म्हणून ४ भारांक पैकी ३.९७ हा सर्वोत्तम व्याख्यानाचा भारांक मिळाला आहे.त्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन:-२०१५-२०१६ जगदीश कुडे यांना मिळाला आहे.तसेच जिल्हास्तरीय जि.प.जालना चा आदर्श शिक्षक पुरस्कार,इतर राज्यस्तरीय व विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.प्रसार माध्यमानी शालेय गुणवत्ता व विद्यार्थी याच्या अंगी असलेल्या कलागुणाची दखल घेतली आहे.पत्रकार बांधव व इतर प्रसार माध्यमांनी शाळेला भेट देऊन कार्याचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र शासन,विद्याप्राधीकरण पुणे,समता विभाग पुणे,जिल्हा परिषद जालना,DIECPD जालना,शालेय व्यवस्थापन समिती श्रीराम तांडा व इतर विभागातील अधिकारी व पदाधिकारी वर्गाच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली शालेय विद्याथी गुणवत्तावाढी साठी शालेय व सहशालेय उपक्रम राबण्यात यश आले आहे.